ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गोपालकाला हा समाजात असणारे भेदभाव नष्ट करतो:देशमुख महाराज, विठ्ठल मंदिर येथे भागवत सप्ताह‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जुने शहरात श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये सहाव्या पुष्पात हभप सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. गोपालकाला हा समाजातील भेदभाव नष्ट करतो, असे ते म्हणाले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर वर्णन आहे. गोप व गोपिकांसोबत जंगलात खेळणे, गाईंसोबत असलेले त्यांचे विशेष प्रेम, यशोदामैय्याला आपल्या लिलांनी त्रास देणे त्यांना मोहित करणे व आपल्या दिव्यत्वाचा आभास करून देणे अशा कथा सुजित महाराज यांनी सांगितल्या. त्यावेळी कालिया मर्दन, कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली पुतना व तिचा केलेला वध या सर्व बाललीला भगवंताने आपल्या समर्थ्याने केल्या हे ही सांगितले.भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर वर्णन आहे. गोप व गोपिकांसोबत जंगलात खेळणे, गाईंसोबत असलेले त्यांचे विशेष प्रेम होते. गोपालकाला करून आजच्या सत्राचे समापन करण्यात आले. त्यानंतर महाआरतीच्या वेळी सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा तसेंच मंडळाकडून यजमान विकास, वैशाली वाणी, प्रवीण पुरवार सपत्नीक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे मार्गदर्शनाखाली नितीन खोत, अजय खोत, प्रमोद अलकरी, नितीन विसपुते, कैवल्य अलकरी, संजय कुलकर्णी, उमेश डहाके, गजानन ठोसर, यश ठाकूर, भगवान मेहर परिश्रम घेत आहेत. तसेच भागवत समाप्तीला म्हणजेच पौर्णिमा ३१ मे रोजी रुख्मिणी स्वयंवाराची कथा व श्रीकृष्ण रुख्मिणी विवाह देखावा करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर