ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पोलिस दलातील सुमारे 900 कर्मचाऱ्यांपैकी एकाच पोलिस ठाण्यात मागील पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू होत्या. बदली प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी त्यांना हवे असलेल्या तीन पोलिस ठाण्यांचे विकल्प मागविण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांनुसार संबंधित ठिकाणी जागा रिक्त असल्यास तत्काळ त्या पोलिस ठाण्यात बदली देण्यात आली. यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी देखील प्रशासनाने जाणून घेतल्या. विशेष म्हणजे अडचणीची परिस्थिती असलेल्या काही कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे बदली प्रक्रियेत मानवी दृष्टिकोन जपण्यात आल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. समुपदेशन पद्धतीने झालेल्या या बदल्यांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. इच्छित ठिकाणी बदली मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने राबविलेल्या या पारदर्शक बदली प्रक्रियेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर