ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत

29 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजय देरकर यांच्या सूचनेनुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे रविवारी (दि. ६ जुलै) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दिनकर अर्जुन मोहितकर यांच्या घराला अचानक आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तूंसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पदाधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

तसेच तात्पुरत्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांच्या घरी पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली.दरम्यान, मुंबई येथे असलेले परिसराचे आमदार संजयभाऊ देरकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना (उ.बा.ठा.)च्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेत बाधित कुटुंबाला आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

या मदत कार्यात तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, तालुका उपप्रमुख देवा बोबडे, शहरप्रमुख अभय चौधरी, संपर्कप्रमुख बद्रुद्दीन काजी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख करण किंगरे, तालुका संघटक राजू मोरे, शिवसैनिक संजय लांबट, युवा सेना तालुका संघटक अतुल मस्की, सरपंच दादाराव टेकाम,

विकास राऊत, शामा ठोंबरे तसेच समस्त सगनापूर ग्रामस्थ सहभागी झाले.दरम्यान, आगीत झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाकडून बाधित कुटुंबाला नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर