ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक

27 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवसेनेकडून आर्थिक मदतीचा हात, शासकीय मदतीची मागणी

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत भूमिहीन शेतमजूर दिनकरराव मोहितकर यांचे घर व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील विद्युत उपकरणे, धान्य, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याने मोहितकर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना (धनुष्यबाण) पक्षाच्या वतीने मारेगाव तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी पक्षाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष कुळसंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गेडाम, सुधाकरभाऊ गोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ब्रह्मदेव जुनगरी, उपतालुकाप्रमुख प्रशांतकुमार भंडारी, जीवनभाऊ डाकरे, शहरप्रमुख विजय मेश्राम, विभागप्रमुख धनराज भट, सहकारी सोसायटी सदस्य गोपालभाऊ खामणकर, युवासेना तालुका अध्यक्ष निखिल कालेकर,

युवासेना संघटक योगेश नागोसे, कार्तिक नेहारे, राजू कापसे, विकास राऊत, भोजराज मस्की, शामा ठोंबरे, संदीप गानफाडे, अमित तुराणकर यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आर्थिक मदत स्वीकारताना दिनकरराव मोहितकर यांनी मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांनी संबंधित कुटुंबाला शासनाकडून नियमानुसार मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.दरम्यान, या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या प्रचलित नियमांनुसार तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर