ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

‘रिटर्न गिफ्ट’ असावे तर असे!:लग्नात 3500 गावकऱ्यांना दिला अपघाती विमा; PM मोदींकडून पेठकर कुटुंबाचे कौतुक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला आहे. या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी या घटनेची माहिती संपूर्ण देशाला देत पेठकर कुटुंबाचे भरभरून कौतुक केले. ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात वाढदिवस किंवा लग्नकार्य हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम नसून तो संपूर्ण समाजाचा उत्सव असतो. आपला आनंद इतरांसोबत वाटावा, अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते आणि त्यातूनच पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या जातात. परंतु, महाराष्ट्रातील नांदेडमधील बहादरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने आपला आनंद वाटण्यासाठी असा एक निर्णय घेतला आहे, जो सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. जर आनंद वाटायचाच असेल, तर कठीण काळात एखाद्या कुटुंबाला आधार देणारी गोष्ट द्यावी, या विचारातून त्यांनी घरातील विवाहाच्या निमित्ताने गावातील जवळपास साडेतीन हजार लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली, असे पंतप्रधानांनी सांगितले. या उपक्रमामागील भावना अत्यंत हृदयस्पर्शी असल्याचे सांगत, अपघातानंतर कुटुंबांना येणाऱ्या आर्थिक अडचणींच्या काळात ही छोटीशी मदतही खूप मोठा आधार बनेल, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची प्रशंसा केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर