ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख

24 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे रविवारी (दि. ५ जुलै) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास एका घराला भीषण आग लागून घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची पडताळणी सुरू आहे.ही घटना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूस असलेल्या दिनकर अर्जुन मोहितकार यांच्या घरात घडली.

आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने घरातील फ्रिज, दूरदर्शन संच (टीव्ही), फॅन,कपडे, घरगुती साहित्य तसेच अन्य संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी, पोलीस, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग शेजारील घरांमध्ये पसरण्याचा मोठा धोका टळला.

दिनकर मोहितकार यांच्याकडे स्वतःची शेती नसून ते ठेक्याने शेती तसेच रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या आगीत त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून, दैनंदिन वापराच्या अत्यावश्यक वस्तूही नष्ट झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

गावकऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले असावे. मात्र, अधिकृत पंचनामा आणि महसूल विभागाच्या अहवालानंतरच नुकसानीची अंतिम रक्कम स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील बाधित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, जीवनावश्यक साहित्य आणि शासकीय मदत त्वरित मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर