ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

२०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

34 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे निवेदन

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : २०१५ पासून अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन (Restructuring) झालेल्या तसेच २०१७ ते २०१९ या कालावधीतील कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी बाळासाहेबांची शिवसेना, मारेगाव तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना–२०२६’ मधील विविध अटी व शर्तींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१५ पासून थकीत असलेल्या, कर्ज पुनर्गठन झालेल्या तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधून वगळलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा नव्या योजनेत समावेश करून त्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांवरील उर्वरित कर्ज भरण्याची अट शिथिल करून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन व्यापक निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी निवेदनावर तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार, जीवन वि.काळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मारेगाव, ब्रह्मदेव मारोती जुनगरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, विजय मेश्राम शहर प्रमुख मारेगाव,

संजय विनायक आवारी तालुका समन्वयक, राजू पुंडलिक कापसे मारेगाव,धनराज तात्याजी भट विभाग प्रमुख, प्रवीण बाबाराव गमे, शुभम विलास ठावरी, सुरेंद्र नारायण काकडे, दिगंबर शुक्राचार्य नावडे, अनिल राऊत विभाग प्रमुख,यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर