ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी

140 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनसेकडून मानधनावर तात्पुरत्या शिक्षकाची तयारी
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जळका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरवून शासनाच्या शैक्षणिक धोरणाकडे लक्ष वेधले.

या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे तसेच प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जळका शाळेत तातडीने शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, तसेच त्या शिक्षकाचे मानधन मनसेच्या वतीने देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रश्न मार्गी लागल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ८३ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. जळका शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक अक्षरओळखही व्यवस्थित नसल्याचे या वेळी निदर्शनास आले.

शिक्षकांच्या कमतरतेबरोबरच शाळेची इमारतही जीर्ण अवस्थेत असून तिची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहराध्यक्ष चांद बहादे, आकाश खामणकर यांच्यासह जळका गावातील पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर