ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष

8 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शालेय साहित्य, फळवाटप, ५६ वृक्षांचे वितरण; शिवसेनेचे सामाजिक बांधिलकीचे दर्शन

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव: राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांची मालिकाच राबविण्यात आली.

शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांनी मारेगाव शहरात सकारात्मक वातावरण निर्माण केले.तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व आशा सेविकांना फळांचे वितरण करून सेवाभावाचा अनोखा संदेश देण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधत मार्डी चौक येथे प्रतीकात्मक स्वरूपात ५६ वृक्षांचे वाटप करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. “वाढदिवस साजरा करायचा तर समाजासाठी काहीतरी देऊन,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.माजी तालुका अध्यक्ष तथा विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गजानन पाटील किन्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

महिला जिल्हा उपाध्यक्षा उज्वला चंदनखेडे, महिला आघाडी अध्यक्षा कल्पनाताई गावंडे, तालुका समन्वयक संजय आवारी, शहरप्रमुख विजय मेश्राम,युवासेना तालुका अध्यक्ष निखिल कालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गेडाम, आयुष ठाकरे, योगेश नागोसे, कार्तिक नेहारे,

तेजस कापसे, वेदू सिडाना, शुभम ठावरी यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शहर आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजहिताला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत करत, अशा विधायक उपक्रमांची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर