विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा सन्माननीय रोहित पवार आणि इतरही अनेकांनी हा मांडला आहे. मी सुरुवातीला याची वस्तुस्थिती मांडतो. दिनांक 28.1.2026 रोजी बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात केंद्र सरकारने जी काही एसओपी आहे त्यांची कारवाई सुरू केली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देखील आपण चौकशी दिली आहे. सीआयडी याचा तपास एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आता त्यातली जी काही निरक्षण आहेत, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्त्वावर हवाई वाहनांना पुरवठा करण्यासाठी शासनाने दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. दिनांक 27.1.2026 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती प्रवास निश्चित झाला. या दौऱ्याची माहिती त्यांचे खासगी सचिवांकडून एरो एयरक्राफ्ट सेल्स या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आले. त्यानंतर 28 तारखेला मुंबई ते बारामतीच्या दौऱ्यासाठी कंपनीकडून 20 वाजून 45 मिनिटांनी विमान बूक करण्याबाबत कारवाई करण्यात आली. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीची टाइम लाइन देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अॅनलायझर टेस्ट 28 तारखेला सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी व कोपायलट शांभवी पाठक यांची टेस्ट सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली. या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही. अजित पवार हे देवगिरी निवसस्थानवरून विमानतळावर सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विमानात बसले आणि विमान सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले आहेत. मुंबईच्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार आल्याचे तसेच विमानात बसल्याचे दिसते. परंतु, बारामती विमानतळावर सदर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले. अजित पवारांच्या पोस्ट्मॉर्टम रिपोर्टमध्ये काय आढळून आले? देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सदर प्रकरणी पोस्ट्मॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर चार यांचे मृत्यूचे कारण डेथ ड्यू टु मल्टिपल इन्जुरीज असोसियटेड विथ बर्न इन्जुरीज असे देण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व सदस्यांचे डीएनए अहवाल आले असून ते त्यांच्या नातेवाईकांशी जुळले आहेत. पायलट व कोपायलट यांचा व्हीसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व मृत पावलेल्या सर्व पाच जणांचा व्हीसेरा व रक्त तपासणीत विषाचा अंश आढळून आलेला नाही. तसेच विमानातील स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक शाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. अजितदादा यांच्याशी संबंधित लोकांशी चौकशी करण्यात आली असता सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याचे आढळून आले नाही. पायलटची नेमणूक देवेंद्र फडणवीस म्हणाले, 27 तारखेला 21 वाजून 11 मिनिटांनी स्लॉट आलोटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्र्यु डीटेल म्हणून पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती विमानतळ डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारचे नावे देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे, त्यानंतर पायलट व कोपायलटची नेमणूक केली जाते अशी माहिती VSR कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंह यांना नेमण्यात आले. मात्र राहुल ओबेरॉय यांचे पोट खराब असल्याने त्यांना संध्याकाळच्या लातूर दौऱ्यासाठी नेमले. त्यांच्या ऐवजी कॅप्टन सुमित कपूर व शांभवी पाठक यांना नेमण्यात आले. त्यामुळे त्यांची नेमणूक अचानक नव्हती केली. तसेच त्यांनी उड्डाण करण्यापूर्वी व्यवस्थित आराम केला होता. बारामती विमानतळ अनफिट आढळून आले देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकूणच तपासात तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थाळ तपासणी, हवामान परिस्थितीचा अभ्यास या सगळ्या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे. एएआयबी नुसार बारामती विमानतळावर अधिकृत मेटेरिओलॉजीकल सुविधा उपलब्ध नाही. व्हीएफआर उड्डाणासाठी आवश्यक दृश्यमानता ही किमान 5000 मिटर पेक्षा जास्त अपेक्षित आहे. तथापि घटनेच्या वेळी दृश्यामनता 3000 मिटर इतकी होती. विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही उपकरण उपलब्ध नाही. त्यामुळे सदर लॅंडींग हे दृश्यमानतेवर अवलंबून होते. विमानतळावर स्वतःची एआरएफएफ उपलब्ध नाही. सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते. तसेच त्यावर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळून आली. बारामती विमानतळ हे अनफिट आढळून आले. तसेच आता याचा पाठपुरावा सुरू आहे. झीरो एफआयआर कर्नाटक सरकारला दाखल करून घेण्याचा अधिकार नाही रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पावर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. झिरो एफआयआर म्हणजे काय? हे सांगताना कर्नाटक सरकारला अशा प्रकारचा एफआयआर दाखल करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. अजितदादांच्या अपघातामागे घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कधी कधी राजकीय कारणाने लोकांची नावे टाकली जातात, पण चार्जशीट नाही होत. क्रिमिनल जस्टिस आपण समजली पाहिजे. अपघाताच्या केसमध्ये आपण एडीआरनेच आपण करत असतो. म्हणून मला असे वाटते की कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, पण आमचेही मित्र होते. त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की जेवढे माझ्यासोबत त्यांची मैत्री झाली होती, तेवढी कोणसोबत नसेल झाली. अगदी मी उदाहरण सांगतो, मी बावनकुळे साहेबांना बुक्की मारली तर एफआयआर होईल. पण अपघात प्रकरणी एडीआर होतो. आपण राहुल गांधींना भेटलात. त्यानंतर तुम्ही कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. एफआयआर दाखल होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न का करावे? अजितदादांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अगोदर एडीआर होतो. एडीआर नंतर एफआयआरमध्ये रुपांतरीत होतो. या अपघाताप्रकरणी कर्नाटकमध्ये झीरो एफआयआर दाखल झाला. परंतु हा झिरो एफआयआर हा बेकायदेशीर आहे. कर्नाटकला हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी पीडित एफआयआर करण्याच्या स्थितीत नसेल, तेव्हाच पीडित व्यक्तीला झिरो एफआयआर करता येतो. झिरो एफआयआर दाखल करणे हे कर्नाटक सरकारच्या अधिकारातच नाही, असा कायदा यावेळी फडणवीस यांनी सांगितला. कोणाच्याही बापाला सोडणार नाही तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर न्यायालय एफआयआर दाखल करा असे निर्देश देते. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केले आहे, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आम्ही आकाश पातळ एक करू. अजितदादांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणाच्याही बापाला सोडणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अजितदादांचा घातपात असेल तर आकाश पातळ एक करू:कोणाच्या बापालाही सोडणार नाही, CM देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
-
By सुरेश पाचभाई
- March 25, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही:राजकारणासाठी...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
