ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

जाचक, गुंतागुंतीच्या विविध अटींमुळे कर्जमाफीपासून शेतकरी राहणार वंचित:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जाचक व गुंतागुंतीच्या अटींमुळे शेतकरी पीक कर्जमाफिपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहणार असल्याने कोणत्याही अटी विनाच ही योजना राबवण्यात यावी, अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली. या मागणीसाठी पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदनही सादर केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली. दरम्यान योजनेतील अटी- निकषांबाबत शुक्रवारी राकाँ शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केले. शेतकऱ्यांच्या भावना, अडचणी आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, फिरोज खान, अल्ताफ खान, सरला वरगट, बाबासाहेब घुमरे, ॲड. संदीप तायडे,शाहिद सिद्दीकी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील अनेक जाचक व गुंतागुंतीच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा तसेच योजनेतील विविध अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी राकाँतर्फे करण्यात आली. कर्जमाफीतील अटींबाबत राकाँने महत्त्वाच्या बाबींचा उहापोह केला आहे. सन २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, असे राकाँचे म्हणणे आहे. एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटींमध्ये शिथिलता आणणे आवश्यक आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करणे गरजे आहे. सन २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे वेळेत नूतनीकरण करावे तसेच पेरणीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. सततच्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान आणि कृषी उत्पादनांना मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी हिताचा विचार करून कोणत्याही जाचक अटींशिवाय त्यांना दिलासा द्यावा, असे रफिक सि‌द्धीकी म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता जिल्ह्यातील थकिबाकीदार व अन्य बाबींची चर्चा सुरू झाली आहे. या योजनेनुसार १ एप्रिल २०२९ ते ३० सप्टेंबर २०२५पर्यंत पीक कर्ज थकीत असलेले व ३१ मार्च २०२६पर्यंत कर्ज फेडू न शकलेले शेतकरी कर्ममािफसाठी पात्र आहेत. पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल. तसेच यापूर्वी अर्थात २०१४पासून ते आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन कर्जमाफी योजनांमध्ये किचकट निकषांमुळे ८१ हजार ३३५ शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे आता निकष जाहीर झाल्यानंतर यापैकि किती पात्र आहेत आणि पुन्हा अटी- लालफितशाहीच्या कारभारामुळे किती शेतकरी वंचित राहतील हे आगामी काळात दिसून येईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर