ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पोलिस कर्मचाऱ्यांसह कारागृहातील बंदीजनांना मानसिक स्वास्थ्याचे धडे:माउंट अबू येथील सुरक्षा सेवा प्रभागाच्या वतीने राबवला उपक्रम‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अकोला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (माउंट अबू, राजस्थान) अंतर्गत ‘सुरक्षा सेवा प्रभागा’च्या वतीने अकोला येथे सकारात्मकता व मानसिक आरोग्यावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. भोपाळ येथून आलेल्या ब्रह्माकुमारी साक्षी दीदी, ब्रह्माकुमार शैलेंद्र भाई, बी. के. कमल भाई यांनी अकोला पोलिस मुख्यालय जिल्हा कारागृहात उपस्थिताना मार्गदर्शन केले. पोलिस मुख्यालयात बोलताना वक्त्यांनी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक शक्तीची जीवनातील आवश्यकता स्पष्ट केली. सकारात्मक विचारांनी आत्मबळ कसे वाढवावे. तसेच जीवनात परिवर्तन कसे घडवून आणावे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “शरीर हे केवळ कर्म करण्याचे साधन असून, त्याला चालवणारी ऊर्जा म्हणजेच चैतन्य शक्ती किंवा आत्मा आहे,’ असे त्यांनी सांगितले. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मबळाची गरज असल्याचे सांगत, काही प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करुन घेण्यात आली. यातून सर्वांनी अध्यात्मातून ‘जीवन जगण्याची सुंदर कला’ अनुभवली. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमार विशाल भाई यांनी आभार मानले. संस्था अशा प्रकारची सेवा विनामूल्य देण्यास सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी कारागृह जिल्हा अधीक्षक दत्तात्रय गावंडे, महेंद्र जोशी, बी. के. भाई तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बंदीजनांना चुकांमधून शिकण्याचा कानमंत्र सकाळी ९ ते १० दरम्यान अकोला जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी सत्र घेण्यात आले. “आपण भूतकाळ बदलू शकत नाही, परंतु वर्तमानकाळात शांतीत जगू शकतो,’ असा संदेश यावेळी देण्यात आला. कळत-नकळत झालेल्या चुकांमधून धडा घेत अध्यात्माद्वारे जीवन कसे सुख-शांतिमय बनवावे, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. ब्रह्माकुमारी साक्षी दीदींनी योग कॉमेंट्रीद्वारे सर्वांना आत्मिक शांती व अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर