ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि…
SP News Maregaon

मोर्शीत कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव व सालबर्डी परिसरातील गंभीर वीज समस्या घेऊन त्या परिसरातील नागरिक आज, शनिवारी महावितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी नागरिकांचा संताप उसळला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अंकुश घारड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनाचा अंदाज आल्यामुळे अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला होता. परिणामी महावितरण कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेले डोंगर यावली येथील उपकेंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाही. हे रखडलेले काम अधिक प्रलंबित होत असल्याने तसेच हिवरखेड-दापोरी कृषी फिडर लाईनची अपूर्ण दुरुस्ती व दापोरी गावठाण फिडरवरील विस्कळीत वीजपुरवठा आदी मुद्दे यावेळी अभियंत्यांसमोर ठेवण्यात आले. याशिवाय “शेतकऱ्यांना न्याय द्या” “महावितरण प्रशासन जागे व्हा” अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून डोंगरयावली येथील सब स्टेशनचे काम तत्काळ पूर्ण करून मोर्शी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. धडक मोर्चामध्ये शेतकरी संजय पांडव, विनोद ठोके, अशोक राऊत, मंगेश चवळे, स्वप्नील निंबोरकर, प्रवीण रामटेके, धनंजय अमदारे, मयूर ढवळी, मनीष गुडधे, गजानन वानखडे, शेखर विघे, सूरज महल्ले, धीरज महल्ले, सागर चौधरी, गौरव सोनारे, शुभम मिश्रा, अन्वर खान, अमोल ठोके, सौरभ काळे, आयुष लांडे, राज माकोडे, चेतन माकोडे, कुणाल म्हाला, सौरभ बारमासे, संकेत बारमासे, अनुप केवतकर, परिमल माकोडे, सुदेश हटवार, गिरीश मानेकर यांच्यासह दापोरी,डोंगर यावली, घोडदेव,सालबर्डी हिवरखेड तसेच मोर्शी शहरातील नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी डोंगरयावली येथील सब स्टेशनचे काम २० दिवसात सुरू करून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व मोर्शी शहरासह तालुक्यातील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाय योजना करून वीज ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असे सांगितले. सबस्टेशनचे काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करु

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर