ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोजित त्रिदिन ‘राम कृष्ण हरी’ विशेष संगीत कथा सोहळ्यात ते बोलत होते. अधिकमासाचे पवित्र औचित्य साधून १७ मे ते १९ मे २०२६ या कालावधीत या अध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कथेच्या पहिल्या दिवशी श्रीरामाच्या जीवनावर प्रकाश टाकताना टाक म्हणाले, “श्रीरामकथेतून आपल्याला जीवन जगण्याचे अनेक मौल्यवान बोध मिळतात, जे आजच्या आधुनिक युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत. रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, माणसाला आदर्श व सुसंस्कारीत जीवन जगण्याची दिशा दाखवणारा राजमार्ग आहे. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे मर्म समजावून सांगताना ते म्हणाले की, बुद्धीमान, धर्माधारित आणि परिस्थितीनुरूप योग्य कृती करण्याची थोर शिकवण भगवान श्रीकृष्णाने दिली आहे. श्रीकृष्णाने मानवाला नेहमीच धर्म, कर्तव्य, प्रेम, सत्य आणि व्यावहारिक ज्ञान यांचा अचूक समतोल राखण्याचा अमर संदेश दिला. कथेची सांगता करताना टाक यांनी वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ स्पष्ट केला. “जो माणूस आपल्या माता-पित्यांच्या ऋणाची जाणीव ठेवतो, जीवनात सेवा आणि दयाभावाचा अंगीकार करून अहंकाराचा पूर्णपणे त्याग करतो, तोच खरा वारकरी ठरतो; आणि अशाच निष्कलंक भक्ताला हरी पावतो,” असे त्यांनी सांगितले. या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. आश्रमाच्या वतीने ह.भ.प. राघवानंद महाराज यांनी देवस्थानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्याला सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (पीआय) गडकरी मॅडम, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आश्रमाच्या सर्व साधकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कथा सांगतेच्या प्रसंगी उद्योजक बापूसाहेब डोके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर