ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

जनगणनेच्या कार्यातील शिक्षकाचा मृत्यू:विमाकवच लागू करण्यात यावे, शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कुटुंबाला अर्थसाहाय्य आवश्यक‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. अरविंद त्र्यंबकराव जोध असे त्या शिक्षकाचे नाव आहे. जनगणना राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून असते. राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात स्वगणनेचा टप्पा पार पडल्यानंतर प्रगणकांमार्फत १६ मेपासून घरोघरी जाऊन माहिती संकलन केले जात आहे. हे गणनाकार्य १४ जूनपर्यंत चालणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ व डिजिटल करण्यात आली आहे. नागरिक स्वतः मोबाईलद्वारे माहिती भरू शकतात. जनगणना कायदा १९४८ नुसार नागरिकाची वैयक्तिक माहिती १०० टक्के गोपनीय राहणार आहे. ती कोणत्याही न्यायालयीन किंवा महसुली कामासाठी वापरली जात नाही. दरम्यान महापालिकेच्या उत्तर झोनअंतर्गत अॅग्लो उर्दू स्कूल येथील शिक्षक अरविंद जोध हे १५ मे रोजी जनगणनेचे कार्य करून दुपारी घरी आले. त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे शिक्षक संघटनेने निवेदनात नमूद केले. भविष्यात असा प्रकार घडू नये. त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी संघटनेने केली. सहाय्यक अधीक्षक हर्षदा काकड यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी ज्ञानेश्वर मांडेकर, जयदिप सोनखासकर, परमानंद धोटे, जव्वाद हुसेन, विष्णू जोध, प्रविण लांजुरकर, विलास वखरे आदी उपस्थित होते. उन्हाळा, प्रतिकूल हवामानाचा विचार करून नियोजन करा : शिक्षकाच्या मृत्युमुळे त्यांच्या परिवाराला आर्थिकसह अन्य संकटे आली आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकाच्या कुटुंबाला किमान ५० लाख रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे. अनुकंपा तत्त्वावर तातडीने कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्यात यावी. अशीही मागणी संघटनेकडून करण्यात यावी. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत. त्यासाठी उन्हाळा, प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही. त्या अनुषंगानेही उपाययोजना करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. अशी होतेय प्रक्रिया जनगणनेच्या कार्याची व्याप्ती मोठी आहे. यात इमारत व घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग, प्रवर्ग. राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सोयी-सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी माहिती विचारली जात आहे. असे हे मनुष्यबळ जनगणनेसाठी २ हजार ३३८ घरयादी गट बनवण्यात आले आहेत. एक घरयादी गट जवळपास १८०-२०० घरे किंवा ६५०-८०० लोकसंख्येपासून तयार केला जातो. जिल्ह्यात एकूण २ हजार ६१४ प्रगणक आहेत. प्रत्येक ६ प्रगणकांसाठी १ याप्रमाणे एकूण ४२६ पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर