ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

आता एकच शिवसेना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंची!:कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांचा टोला; महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्याचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली. याचसोबत भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून टोला देखील लगावला आहे. आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा म्हणाले, आता शिवसेनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या मागे आधी शिंदे गट म्हणावे लागायचे, आता कोणता गट राहिलेला नाही. आता एकच शिवसेना झाली आहे, असे शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटले आहे. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर माता अंबाबाई यांचे निवासस्थान जिथे आहे तिथे आम्ही सगळे खूप चांगल्या कामासाठी एकत्रित आलो आहोत. जिथे माता अंबाबाई शेकडो वर्षांपासून निवास करते त्या करवीर नगरमध्ये त्यांच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करत आहे. यामुळे पूर्ण कोल्हापुरात, तसेच महाराष्ट्रासह देशभरात अंबाबाई यांच्या भक्तांच्या मनात आनंद आणि भक्ती पाहायला मिळत आहे. 28 हजार 58 वर्ग मीटर भूमीवर बनवला जाणार असून आणि 7 वी शताब्दीमध्ये स्पष्ट रूपाने आकार घेतलेले हे मंदिर पुन्हा एकदा जोमात आणि ऊर्जासह अंबाबाईच्या भक्तांच्या स्वागतासाठी तयार होणार आहे. अमित शहा म्हणाले, या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कामात पुरातत्व विभागासह चर्चा करून आसपासच्या 41 छोट्या मोठ्या मंदिरांचे संरक्षण करून हे निर्माण कार्य सुरू होणार आहे. संपूर्ण मंदिर परिसराची आधुनिक एआय सज्ज कॅमेऱ्यांसह सुरक्षा सुनिश्चित होत आहे. एलईडीने प्रकाशसज्ज देखील होत आहे, असे शहा यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? अमित शहा यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केले. ते म्हणाले, करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांच्या प्राचीन मंदिराचे जीर्णोद्धार आणि विकास ज्यांच्या शुभहस्ते झाले ते भारताचे अत्यंत कर्मठ आणि कणखर असे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते झाले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांचे जे स्वप्न होते, महालक्ष्मी मंदिर जे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, ही इच्छा पूर्ण करण्याची सुरुवात आज झाली आहे. महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरकरांची जी इच्छा होती, तीच इच्छा दिल्लीतून एक व्यक्ती व्यक्त करत होते, ती व्यक्ती म्हणजे अमितभाई शाहा. ते म्हणायचे की तुमच्याकडे इतके शक्तिशाली मंदिर आहे, त्याचा विकास अजून पाहिजे तसा झाला नाही. आणि त्यांनी आग्रह केला की जी काही मदत लागेल मी करेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अमितभाई कोल्हापूरचे जावाई आहेत. अधिकमास झाल्यानंतर अमितभाई आले, मात्र कोल्हापूरकरांचे तुमच्यावर एवढे प्रेम आहे की तुमची सेवा आम्ही आजही करू. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विकास आणि विरासत हा मंत्र दिला आहे. आज आपला वारसा आपली परंपरा याचे प्रतीक असलेले मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे. या परंपरेत या मंदिराने आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आशीर्वाद दिला आहे. ज्यावेळी संपूर्ण भारतात आमच्या मंदिरांचा विनाश होत होता, त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांनी पुनर्जीवन दिले, तीच परंपरा माननीय मोदी यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आम्ही जात आहोत. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मंदिरात जिथे 50 लाख भाविक येतात, तिरूपती बालाजी यांचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेतात. भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या भाविकांची सेवा करता यावी साठी आम्ही काम करत आहोत. कोट्यवधी भाविक पंढरपूरला जातील त्यांना ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, त्यातून पांडुरंग अधिक आशीर्वाद देईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच सगळ्याच शक्तिपीठांचा विकास आपण हाती घेतल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर