ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी:असह्य उकाड्यानंतर गारवा, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दिवसभराचा असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानाने त्रस्त झालेल्या अहिल्यानगरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने दिलासा दिला. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच फटक्याने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. या पावसामुळे जमिनीला हवा असलेला ओलावा मिळाल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागला होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा चटका इतका तीव्र होता की तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा उकाड्यात मोठी वाढ झाली होती. याच उष्ण वातावरणातून निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, अधूनमधून हलक्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात कुठे, किती पाऊस? जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली असली तरी पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. जिल्ह्यात सरासरी १८.५ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात शुक्रवारी केवळ २.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी काही तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली: कर्जत महसूल मंडळामध्ये तब्बल ४२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोळेगाव येथे १५.५ मिमी तर चिंभळे येथे १०.८ मिमी पाऊस झाला आहे. वेळेअगोदर मान्सून पोहोचणार! ^”सध्या मान्सूनची आगेकूच सामान्य वेळेपेक्षा वेगाने होत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या भागात मान्सूनच्या आगमनासाठी हवामान परिस्थिती अत्यंत अनुकूल बनत आहे. वातावरणातील बदल आणि प्रणालीच्या निर्मितीमुळे मे महिन्याच्या अखेरीस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला गती देणारी एक महत्त्वाची प्रणाली सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होऊन मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होईल. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर