ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

शून्य सावलीपाठोपाठ ३१ मे रोजी दिसणार ‘ब्लू मून’:अमरावतीत एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ‘शून्य सावली’चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. खगोलशास्त्राच्या नियमांनुसार, कोणत्याही दोन पौर्णिमांमधील अंतर हे साधारणपणे २९.५ दिवसांचे असते. यामुळे जेव्हा महिन्याची पहिली पौर्णिमा १ किंवा २ तारखेला येते, तेव्हा त्याच महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ तारखेला दुसरी पौर्णिमा येण्याचा योग जुळून येतो. चालू मे महिन्याची पहिली पौर्णिमा १ मे रोजी झाली असून, दुसरी पौर्णिमा ३१ मे रोजी येत आहे. याच दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला जगभरात ‘ब्लू मून’ म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असल्याने त्यात कधीही ब्लू मून येत नाही, मात्र इतर कोणत्याही महिन्यात हा योग येऊ शकतो. ‘ब्लू मून’ हे केवळ एक नाव आहे. याचा अर्थ ३१ मे रोजी दिसणारा चंद्र निळ्या रंगाचाच असेल असा मुळीच नाही. तो इतर सामान्य पौर्णिमेच्या चंद्रासारखाच पांढरा-सोनेरी आणि चमकदार दिसेल. त्यामुळे नागरिकांनी चंद्रात उगाचच निळेपणा शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. अवकाशात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घडामोडीकडे आपल्याकडे अनेकदा शुभ-अशुभ किंवा अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. परंतु, ही पूर्णपणे एक नैसर्गिक आणि गणितीय खगोलशास्त्रीय घटना आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचारावर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे. या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास ९६३७३८४८१२ वर संपर्क साधावा, असेही विज्ञान परिषदेने कळविले आहे. १५२८ मधील जुनी नोंद आणि १९ वर्षांचे चक्र इतिहासाचा वेध घेतल्यास, ‘ब्लू मून’ची सर्वात पहिली अधिकृत नोंद सन १५२८ मध्ये झाल्याचे आढळते. कधीकधी एकाच वर्षात दोन वेळा ब्लू मून पाहण्याची संधी मिळते. एकाच वर्षात दोनदा ब्लू मून दिसण्याचे हे विशिष्ट चक्र दर १९ वर्षांनी पुनरावृत्ती पावते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर