ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, मी पत्रकारांसोबत:संजय दिना पाटलांचा बोंब मारत निषेध करतो- गुणरत्न सदावर्ते

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटातील फुटीर खासदार आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद अधिवेशनातही उमटलेले दिसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, संजय दिना पाटील यांच्या प्रकरणात मी पत्रकारांसोबत आहे. पत्रकारांनी निसंकोचपणे समोर यावे. मी त्यांच्यासोबत जाईल. जितेंद्र आव्हाड योग्य बोलले. संजय दिना पाटील यांना काहीच माहीत नाही. संजय दिना पाटील यांना रेडीमेड मिळालेले आहे. त्यांना संघर्ष माहीत नाही. त्यांना लोकशाही माहीत नाही, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे. महाराष्ट्र हे खपवून घेत नाही पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मी या मटेरियलला ओळखत नाही. असे मटेरियल महाराष्ट्रात चालत नाही. सामान्य मराठी भाषेत संजय दिना पाटील यांचे असे बोलणे म्हणजे माजलेपणाचे लक्षण आहे. अशा घटनेचा सगळ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी निषेध करायला हवा. माझा कधी संजय दिना पाटील यांच्याशी संबंध आलेला नाही. पण हा प्रकार निंदनीय आणि निषेधार्ह आहे. असे वैचारिक महाराष्ट्रात चालत नाही, महाराष्ट्र हे खपवून घेत नाही. संजय पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकांचे सेवक आहेत. देशात संविधान लागू झालं तेव्हापासून देशातली सगळी दादागिरी, पाटीलकी संपली. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पोलिसांनी या प्रकरणात थेट गुन्हा दाकल करावा. राजकारण्यांची चिंता करू नये. असेच चालू राहिले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नाव शिंदे टोळी असे पडेल, असा टोलाही गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे. पत्रकाराच्या केसाला धक्का लागला तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, पाच खून कोणाचे केले ते संजय दिना पाटील यांना सांगावे लागेल. पोलिसांनी त्याचा तपास करावा. आज एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटील यांना बोलावून घेऊन पत्रकारांसमोर उभे करायला हवे होते. मुख्यमंत्र्यांनी क्रिमिनल कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच पत्रकाराच्या केसाला धक्का लागला तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे. तसेच शेवटी, संजय दिना पाटील यांचा बोंब मारून मी निषेध व्यक्त करतो. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा आणि मी संजय दिना पाटील विरोधात गुन्हा दाखल करायला तयार आहे. मी पत्रकारांसोबत आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर