ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

‘दुनियादारी’चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?:लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या डोक्यात दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार आला. पण सिनेसृष्टीतील मित्रांच्या मदतीमुळे ते त्यापासून परावृत्त झाले. हे सर्व कसे घडले हे त्यांनी स्वतःच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट खूप गाजला. पण त्यानंतर त्यांना एकही हीट चित्रपट देता आला नाही. लॉकडाऊननंतर त्यांच्या आयुष्यात डाऊनफॉल आला. त्यांना त्यांची मर्जिडीजही विकावी लागली. ऑटोतून फिरण्याची वेळ आली. यामुळे ते नैराश्यात गेले. पण नंतर ते सावरले. त्यांनी सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपल्या डाऊनफॉलविषयी विस्तृत माहिती दिली. सई ताम्हणकर आजही फोन करते संजय जाधव म्हणाले, मी यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा मला एकटे वाटत नव्हते. पण जेव्हा अपयश आले, चित्रपट चालेनासे झाले, तेव्हा मला एकटेपणा यायला लागला. पण माझ्या आई-वडिलांची पुण्याई असेल, माझ्या आयुष्यात माझी काळजी करणारी माणसे आहेत. आजही सई ताम्हणकर मला हक्काने फोन करते. तुझे सगळे ठीक चालू आहे ना, तू ठीक आहेस ना, आपण कॉफी प्यायला जाऊया का असे विचारते. तेजस्विनी पंडीत, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव यांना मी काय बोलू. देवाने पाठवलेली माणसे आहेत ही. मला दोनदा सर्वकाही संपले असे वाटले. स्वतःला संपवून टाकावे असे वाटले. पण याच माणसांमुळे मी टिकलो. हे लोक काय कमी बिझी आहेत का? पण त्यानंतरही ते माझ्या घरी येतात. मला म्हणतात, चल ना वडापाव खायला जाऊ. खूप वर्षांपासून ते असे करत आहेत. काय गरज पडली त्यांना. सोनाली खरे तर अशीच सहज मला भेटते. मला कळत नाही का? की ते मला का भेटतात ते. मर्सिडीज विकली, ऑटोतून फिरलो संजय जाधव म्हणाले, माझ्याकडे मर्सिडीज होती. पण लॉकडाऊननंतर मला सगळे विकायला लागले. मी ऑटोने फिरायचो. पण अमितराजने मला कधीच ऑटोने जाऊ दिले नाही. अमेय खोपकर, त्याचा पार्टनर ही जी माणसे आहेत ना, दादा आप लंडन की फिल्म करोगे म्हणून मला लंडनला घेऊन गेले. कोण करते असे? संजय जाधव पुढे म्हणाले, नितीन देसाईंनी आत्महत्या केली. कष्ट काही नसताना मला क्षीतिज पटवर्धनने फोन केला. मला कळत नव्हते का, त्याने का फोन केला? पण तो असे दाखवत होता की, नाही दादा आज ना इथे जायचेच होते आणि ममला वाटले की, वडापाव खाऊया. तर भेटूया जरा. मी उदाहरणे म्हणून ही नावे सांगितली. पण असे सगळे लोक आहेत इंडस्ट्रीमधले. या लोकांनी कधीच माझे वाईट केले नाही. विश्वास ठेव. माझ्या वाईट विचार करण्याच्या पद्धतीमुळे हे सर्व झाले. एक वेळ होती, जेव्हा मी सकाळी उठल्यापासून लोकांना शिव्या घालायचो. मी वाईट झोनमध्ये होतो. पण त्या लोकांनी माझी संगत सोडली नाही. तेजूने तर मला एवढ्या घटनांमधून बाहेर काढलंय ना. कुठल्या मातीची बनली आहेत ही माणसे काय माहिती, असे संजय जाधव यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर