ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून रोज भल्या पहाटे रक्ताचे पाणी करणारा, २८ वर्षांच्या सुहासचा धावण्याचा सराव करताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

आई-वडिलांचा आधार गेला
सुहास संभाजी पाटील (वय २८) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सुहास हा अत्यंत गरिबीतून आणि हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता. सततची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच त्याची ‘महाराष्ट्र सुरक्षा दलात’ निवड झाली होती. मुंबईत नोकरीला असलेला सुहास काही दिवसांच्या सुट्टीसाठी धुळ्यातील आपल्या नगाव या मूळ गावी आला होता.

खाकी वर्दी मिळाली तरीही पुढे अजून मोठी पोलीस भरती मारायची, या जिद्दीने तो रोज न चुकता सराव करत होता. सोमवारी सायंकाळीही तो गावाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता. सराव करताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रस्त्यावरच कोसळला. उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नगाव गावात दोन वर्षांत दुसरी घटना
सुहासच्या या अकस्मात जाण्याने नगाव आणि परिसरात प्रचंड भीतीचे व हळहळीचे वातावरण पसरले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या गावात गेल्या दोन वर्षांत घडलेली ही दुसरी हृदयद्रावक घटना आहे. याआधी ४ मार्च २०२४ रोजी जयेश कैलास पाटील या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचाही असाच धावताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ऐन उमेदीच्या काळात, अंगात ताकद असताना आणि पोलीस भरतीचे स्वप्न डोळ्यात असताना अचानक काळजाचे ठोके बंद पडल्याने ‘हे नक्की काय घडतंय?’ या विचाराने नगाव ग्रामस्थ आणि तरुण धास्तावले आहेत.

डॉक्टरांनी दिला सल्ला
ऐन तरुण वयात धावताना किंवा व्यायाम करताना येणाऱ्या या सायलेंट हार्ट अटॅकबाबत हृदयरोग तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलीस भरती किंवा इतर खेळांचा कडक आणि कठीण सराव करणाऱ्या तरुणांनी वेळोवेळी आपल्या हृदयाची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सरावादरम्यान अचानक चक्कर येणे, अतिप्रमाणात घाम येणे, छातीत किंवा पाठीत न कळणारी अस्वस्थता जाणवल्यास सराव तात्काळ थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर