ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


IND vs SL Practice Match Gautam Gambhir Angry : श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून पहिल्या मॅचला सुरूवात होईल. त्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. पण टीम इंडियासोबत गोलीगत धोका झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या सामन्याच्या पीचबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यावर भारतीय संघ व्यवस्थापन नाराज असल्याची माहिती मिळतीये.
श्रीलंका क्रिकेटची डबल ढोलकी ?
तसं पहायला गेलं तर, श्रीलंकेतील पीच बहुतेकदा स्पनिर्सला अनुकूल असतात. यावेळीही तशीच अपेक्षा होती, पण पीचवर गवत तसेच ठेवल्यानं संघ व्यवस्थापनाला राग आला. सराव सामन्यासाठीची पीच गवताने भरलेली होती, ज्यामुळे संघ व्यवस्थापन नाराज झाले. मात्र, पीचच्या क्युरेटरने नंतर उत्तर दिलं की, पीच चांगली असून ती बॅटिंग आणि बॉलिंग दोघांसाठीही उपयुक्त ठरेल. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट टीम इंडियाला गोंधळात टाकण्यासाठी डबल ढोलकी वाजतंय का? असा सवाल विचारला जात आहे. रेव्हस्पोर्ट्झच्या एका अहवालानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन पीचवरील गवतामुळे नाराजी व्यक्त केली.

IND vs PAK : ठरलं तर मग! ‘या’ दिवशी भिडणार इंडिया आणि पाकिस्तान; आशिया कपचं शेड्युल जाहीर
तीन दिवसांचा सामना म्हणून…
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे अधिकारी ए. फ्रँके यांनी म्हटलंय की, "टीम इंडियाने म्हटलं आहे की, खेळपट्टीवर खूप जास्त गवत आहे. मात्र, आम्ही ती तशीच ठेवली कारण हा तीन दिवसांचा सामना आहे. तुम्ही गवताशिवाय खेळपट्टी देऊ शकत नाही. त्याव्यतिरिक्त, ते खेळपट्टीवर खूश होते. आम्ही दिलेली खेळपट्टी चांगली आहे. ती कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरेल की नाही हे मी सांगू शकत नाही. ते कसे खेळतात यावर ते अवलंबून असेल.", असंही पीचच्या क्युरेटरने म्हटलंय.
आम्ही मैदानात गवत असंच ठेवणार आहोत – पीच क्युरेटर
दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने सामन्यासाठी थोड्या गवताची विनंती केली होती. त्यामुळे, आम्ही मैदानात गवत असंच ठेवणार आहोत. नंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो, असं म्हणत पीच क्युरेटरने मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या मॅचमध्ये गवत पहायला मिळू शकते. त्यामुळे मोहम्मद सिराजचा रोल महत्त्वाचा राहणार आहे. 15 ऑगस्ट रोजी पहिला कसोटी सामना सुरू होईल. दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळला जाईल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर