ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शरद पवार गटाचा शिंदे गटावर पलटवार:खासदार ज्योती वाघमारे ऑपरेशन केव्हापासून करायला लागल्या कळले नाही – शशिकांत शिंदे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. खासदार ज्योती वाघमारे दिल्लीत जाऊन केव्हापासून ऑपरेशन करायला लागल्या हे कळत नाही, असे ते म्हणालेत. प्रा. ज्योती वाघमारे नुकत्याच एका कार्यक्रमासाठी नांदेड दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथे त्यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, पण ते योग्य वेळी होणार, असे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, ज्योती वाघमारे यांना प्रथमच राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा आहे. पण दिल्लीत गेल्यानंतर त्या ऑपरेशन कधीपासून करायला लागल्या हे मला कळत नाही. ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे. आता इराण व अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. त्याचा मोठा जनतेला बसत आहे. या प्रकरणी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाघमारे यांनी या अडचणींवर बोलावे. ते म्हणाले, ऑटो चालकांना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यापुढे प्रश्न मांडताना अश्रू अनावर झाले होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही गॅस टंचाईविषयी पत्रातून भाष्य केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही प्रकारची गॅस टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे गॅस टंचाईमुळे हॉटेलांमधील पदार्थ कमी होत आहेत. त्यामुळे ज्योती वाघमारे यांनी ही टंचाई, युद्ध परिस्थिती व भविष्यातील संकट यावरही लक्ष द्यावे. आमचा एकही खासदार फुटणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्या माहितीनुसार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासह आमचे खासदार दिल्लीत युद्ध व त्याचे परिणाम यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आमचे ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. एखादेवेळी पर्याय निर्माण होतो आणि तो पर्याय आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार साहेबांचा पक्ष चर्चेत आणण्याचे काम कोण करत आहे? हे ऑपरेशन राज्यात व केंद्रात कशासाठी केले जात आहे? आमचा एकही खासदार फुटणार नाही. सत्ताधारी पक्षाकडे एवढे बहुमत असताना हे फोडाफोडीचे राजकारण का केले जात आहे हे मला कळत नाही, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर