ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर – एकीकडे सोशल मीडियाचा वापर करून जेन झी देशाची समस्या व प्रश्न मांडत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत रमणाऱ्या तरुणाईवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे धक्कादायक चित्र सोलापुरात समोर आले आहे. माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील रील्स आणि फॉलोअर्स तू का कमी केलेस? अशी विचारणा करत एका तरुणाला दोघांनी लोखंडी कड्याने मारहाण केली. रोहित व्हनप्पा गोडनवरू (वय 17, रा. भवानी पेठ) असे जखमीचे नाव आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मारहाण करणारे व मारहाण झालेले सर्वच तरुण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

नेमकी घटना काय?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास रोहित गोडनवरू हा आपल्या घराजवळ बसला होता. त्यावेळी गजानन काळे आणि मल्लिकार्जुन सुलतानपुरे तिथे आला आणि "माझ्या इन्स्टाग्रामवरील रील्स आणि फॉलोअर्स तू का कमी केलेस?" असा जाब विचारत रोहितला शिवीगाळ करू लागला.

Solapur: 8 दिवस रेकी, रात्री छतावरच झोपायचे जवान, सोलापुरात थरारक कारवाई, ‘तो’ कारखाना उद्ध्वस्त

पुढे वाद विकोपाला गेला आणि गजाननने हातातील स्टीलच्या कड्याने रोहितच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. त्याच वेळी तेथे मल्लिकार्जुन सुलतानपुरे हे देखील त्या ठिकाणी आला व रोहितला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी आलेला रोहितचा मावस भाऊ सतीश वडलर यालाही या दोघांनी मारहाण केली.

जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी रोहितने दिलेल्या तक्रारीवरून गजानन काळे आणि मल्लिकार्जुन सुलतानपुरे (दोघे रा. धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) या दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1), 115, 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दुधाळे करत आहेत. डिजिटल जगातल्या फॉलोअर्स आणि रील्सच्या वादातून थेट रस्त्यावर उतरून प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मुलांची मजल गेल्याने, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जोडभावी पेठ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर