ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पीडिता मुलगी मामाच्या घरी जात होती; लोकलची वाट पाहताना आरोपीने हेरले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगरहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने कल्याण रेल्वे स्थानकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना ही घटना घडली आहे हे विशेष. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथून खोपोली येथे आपल्या मामाच्या गावी जात होती. ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मुलीने त्याच्याकडे आपला मोबाईल परत मागितला असता त्याने ‘मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये चल’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन कल्याण रेल्वे यार्डात गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेने स्वतःची कशीबशी सुटका करून घेऊन रेल्वे पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. तिची आपबीती ऐकताच पोलिसांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखत तातडीने तपासाला सुरूवात केली. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळून आरोपी सौरभ सोनावणे याच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या मते, पीडित मुलीला कल्याणहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जायचे होते. त्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर गुन्हा घडल्याने संताप उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण रेल्वे स्थानकावर 24 तास प्रवाशांची वर्दळ असते. एवढ्या वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडल्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः आरोपी मुलीला त्रास देत होता तेव्हाही तिथे काही प्रवाशी असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांची या मुलीला कोणतीही मदत झाली नसल्याचेही दिसून येत आहे. या एकूणच प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नसरापूर प्रकरणात 1100 पानी आरोपपत्र दाखल दुसरीकडे, पुणे पोलिसांनी नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात तब्बल 1100 पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए टेस्ट, वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवालाचा तपशील जोडण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी नसरापूर येते एका साडेतीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर संतप्त पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा अहोरात्र तपास करून गुन्हा घडल्याच्या 15 दिवसांतच शनिवारी रात्री आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर