ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज!

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांची मोठी भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या या भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 जानेवारीत घेण्यात आली होती. आता पात्र उमेदवारांसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया 6 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे.

27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत झालेल्या ऑनलाईन चाचणीसाठी एकूण 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला बसले. यातून 1 लाख 70 हजार 108 उमेदवार पात्र ठरले आहेत. या गुणांच्या आधारेच इयत्ता 1 ली ते 12 वी साठी शिक्षक भरती होणार आहे.

पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खाजगी संस्थांकडून आलेल्या मागणीनुसार एकूण 30,209 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

एकूण पदे 

जिल्हा परिषद – 13,351
महानगरपालिका – 1,954
नगरपालिका – 280
आदिवासी विभाग – 2,421
शासकीय विद्यानिकेतन – 56
खाजगी संस्था – 12,148 पदांचा समावेश आहे.

यापैकी 10,328 पदे मुलाखतीशिवाय तर 19,881 पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.

इयत्तानिहाय पदे

सर्वाधिक पदे प्राथमिक विभागासाठी आहेत.

1 ली ते 5 वी – 14,320,
6 वी ते 8 वी – 10,012
9 वी ते 10 वी – 5,513
11 वी ते 12 वी – 364 पदे रिक्त आहेत.

असा करा पसंतीक्रम लॉक 

उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करून प्रथम पसंतीक्रम निर्माण  करावा लागेल. त्यानंतर 06/08/2026 ते 11/08/2026 या कालावधीत पदनिहाय पसंतीक्रम भरून तो लॉक करणे बंधनकारक आहे. यानंतर मुलाखतीशिवाय पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. भरतीबाबत तक्रारी किंवा सूचना असल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शासन निर्णयानुसार 80 टक्के पदांसाठी आरक्षणाचे नियम लागू राहतील.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर