ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अमित ठाकरेंनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे:आदित्य निवडून आले, पण तुम्हाला पाडले; रामदास कदमांचा सावधगिरीचा सल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रामदास कदम म्हणाले, अमितजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्यांनी ‘मातोश्री’ पासून जरा सांभाळून राहावे. आज आदित्य तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले आहेत, भाऊ म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण हा भाऊ किती दिवस टिकेल हे पहावे लागेल. आदित्य ठाकरे निवडून आले, पण तुम्हाला त्यांनी पाडले. ‘मातोश्री’चे प्रचंड प्रेम आहे तुमच्यावर, असा खोचक टोला कदम यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना रामदास कदम म्हणाले, सत्ता चालवायची असेल तर दिल्लीला पैसे आणण्यासाठी जावं लागतं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, उद्योजकांचेही काही प्रश्न असतात, त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे, ते उत्कृष्ट काम करत आहेत, मराठी माणसाला ठेच लागेल असं कुठलंही काम त्यांच्याकडून होत नाही, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो, ‘एकनाथजी आप आगे बढो, हम सब आपके साथ है’, असेही कदम यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जातात- गिरीश महाजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही इतर खाजगी कामे असतील. जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असे समजण्याचे काही कारण नाही. विधान परिषदेच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार हे एकत्रित बसून त्या संदर्भात निर्णय घेतील, असे महाजन यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर