ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे म्हणाल्या की, जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या संपर्कात आले, पण कुठल्या एका विचारधारेशी बांधून घेतले नाही. आजवरच्या लेखनाने खूप आनंद दिला. लेखनाच्या निमित्ताने आपल्या चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव पहायला शिकले. मध्यवर्गीय कवचाबाहेर पडण्याच्या सततच्या धडपडीतूनच मला जगण्याचे भान आले आणि माणसाच्या जगण्याकडे बघता आले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण अध्यक्षस्थानी होते. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू, प्रसाद मिरासदार, डॉ. नितीन संगमनेरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रतिभा रानडे पुढे म्हणाल्या की, निसर्ग आणि माणसाचे जगणे याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. मी जिथे जिथे गेले, तिथला इतिहास, संस्कृती, सामाजिक, राजकीय स्थिती आणि धर्मसंस्कृती व राजकारणाचा सामान्य माणसावर झालेला परिणाम अभ्यासत गेले. यातून धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, पण सामान्य माणूस मात्र संस्कृतीशी जोडला जातो, हे मला समजले. पंडित सत्यशील देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लेखकांना संगीताची संवेदना आकलन झाल्यास गद्य वाक्ये देखील लयदार होतात. बंदिशीतल्या शब्दांमधून संवेदना तीव्र, तीक्ष्ण झाल्यास बंदिशीचे सादरीकरण प्रभावी ठरते. गायकांनी देखील भवतालच्या वाङ्‌मयाचा अभ्यास करावा. छंदोबद्ध मुक्तछंदालाही लय असते; परंतु आज मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींचा छंदाचा अभ्यास नाही, असे जाणवते. साहित्यकृतीतून साकारलेल्या शब्दांना वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भ असतात आणि त्या संदर्भातून अर्थाच्या छटा बदलत राहतात. मनाला झालेल्या जाणीवांमधून उत्कृष्ट साहित्यकृतींची निर्मिती घडत असते. भावनेला शब्द करणे हे साहित्यिकाचे वैशिष्ट्य आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर