ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर : पंढरपूरच्या पवित्र भूमीत त्या रात्री दुःखाचा डोंगर कोसळला. ‘आई, इथे मला मारायला लागलेत, लवकर ये, मला वाचव,’ असा थरकाप उडवणारा व्हॉट्सअॅप संदेश आईला पाठवल्यानंतर अवघ्या काही तासांतच एका 23 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री पंढरपुरात उघडकीस आली. शुभम मोनाप्पा सुतार (वय 23, मूळ रा. सिद्धनाथ, ता. जत, जि. सांगली; सध्या रा. गाडगे महाराज चौक, पंढरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास शुभमने आपल्या आईला लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी हॉटेलचे लोकेशन पाठवून स्वतःला मारहाण होत असल्याचे कळवले होते. संदेश मिळताच आईने तातडीने घटनास्थळी धाव घेतली; मात्र तेथे शुभम आढळून आला नाही.

त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास शुभमचा भाऊ संदीप याला रस्त्यावर एका मित्राची कार दिसली. संशय आल्याने त्याने कारजवळ जाऊन पाहिले असता शुभम गंभीर जखमी अवस्थेत आणि कोणतीही हालचाल न करत पडलेला दिसला. कारमधील तिघांनी ‘त्याला पंधरा मिनिटांत घरी आणून सोडतो’ असे सांगून तेथून पळ काढला.

संदीप संशयावरून कारचा पाठलाग करत मागावर राहिला. ती कार थेट पंढरपुरातील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबली. तेथे तपासणी केली असता डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून प्राथमिक तपास सुरू केला आहे. तरुणाला करण्यात आलेल्या मारहाणीचे नेमके कारण काय होते आणि कारमधील व्यक्तींची यात काय भूमिका आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयित आरोपींच्या अटकेसाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर