ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

अंजनगावात उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:युवा शेतकरी बऱ्हाणपुरे यांच्या कष्टांना मिळाले फळ‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे येथील प्रगतीशिल युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या केवळ २ एकर क्षेत्रात तब्बल १० क्विंटल उन्हाळी मुगाचे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी परिसरातील तरुण शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत बऱ्हाणपूरे या युवा शेतकऱ्याने एक नवीच किमया घडवून दाखवली, त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी गर्दी करीत आहे. विशेष म्हणजे दर्शन बऱ्हाणपुरेदेखील या प्रयोगमागची कल्पना व त्या कल्पनेला मिळालेले फळ यासंबंधीचा प्रवास त्यांच्यासमोर उलगडत आहेत. आजच्या काळात अनेक तरुण शेतीपासून दूर जात असताना, दर्शन यांनी मात्र शेतीतच आपले भविष्य शोधले. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी उन्हाळी मुगाची निवड केली. हवामानाचा अंदाज, जमिनीचा पोत आणि पाण्याची उपलब्धता या सर्वांचा अचूक ताळमेळ घालत त्यांनी या पिकाचे नियोजन केले होते. दर्शन बऱ्हाणपुरे यांचे हे यश कौतुकास्पद असून, त्यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. “कष्टाला नियोजनाची जोड दिली तर शेती कधीच तोट्यात जात नाही,” असा विश्वास दर्शन यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत असून, अनेक युवा शेतकरीसुद्धा या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. नियोजन, कष्टाचे फळ उन्हाळी हंगामात मुगाचे पीक घेणे हे तसे आव्हानात्मकच असते. मात्र दर्शन यांनी योग्य वेळी पेरणी, खतांचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या कष्टाला यशाची जोड मिळाली आणि केवळ २ एकरात १० क्विंटल मुगाचे उत्पादन झाले. बाजारभाव आणि उत्पादनाचा खर्च पाहता, हा प्रयोग अत्यंत किफायतशीर ठरला असा त्यांचा अनुभव आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर