बातमी ऐका (Marathi Voice Reader)
खापरी येथे आज दुपारी २ वाजता अंत्यविधी
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील खापरी येथील रहिवासी लिलाबाई बापूराव कुचनकर (वय ७८) यांचे मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) पहाटे २ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुचनकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लिलाबाई कुचनकर या खापरी गावातील वृद्ध, मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या व्यक्ती म्हणून परिचित होत्या. गावातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर २०२६) दुपारी २ वाजता खापरी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.