बातमी ऐका (Marathi Voice Reader)
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा आज किंवा उद्या अचानक दिल्ली दौरा होण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा आज किंवा उद्या अचानक दिल्ली दौरा होण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. ही बैठक त्याच अनुषंगाने होण्याची शक्यता आहे. तर, पितृपक्ष पंधरवड्यानंतर केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदलाची देखील चर्चा जोर पकडू लागली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरीची ठिणगी
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत मोठी बंडखोरी उफाळून आल्याचे चित्र आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा आज किंवा उद्या अचानक दिल्ली दौरा होण्याची दाट शक्यता आहे. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जागावाटपावर थेट चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेलेल्या काही जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही जोरदार दावा ठोकला आहे. नवीन जागावाटप फॉर्म्युल्यानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर या तीन जागा भाजपकडे गेल्या आहेत; तर अमरावतीची जागा शिवसेनेला (शिंदे गट) आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीला (अजित पवार गट) सोडण्यात आला आहे.
मात्र, या फॉर्म्युल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत तीव्र नाराजी पसरली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश चिवटे यांनी उघडपणे बंडखोरीचे निशाण उभारले आहे. ते अपक्ष किंवा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समजते.