ब्रेकिंग न्यूज
⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा… ✦ ⚡ नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत ✦ ⚡ महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच अर्ज करा आणि शेतकरी प्रमाणपत्र घ्या, सरकारी योजनांचा थेट लाभ ✦ ⚡ गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ ✦ ⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच…
SP News Maregaon

दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सेवानिवृत्तीनिमित्त शाल-श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार; राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव  शिरपूर, ता. वणी : येथील श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर प्रार्थ आश्रमशाळेत प्राथमिक ज्येष्ठ शिक्षक म्हणून तब्बल ३० वर्षे अविरत ज्ञानदानाचे कार्य करणारे दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला अखेर ३० जून २०१६ रोजी सेवानिवृत्तीने विराम मिळाला. त्यांच्या तीन दशकांच्या ज्ञानयज्ञाची सांगता होत असताना शाळेच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

दिनेश वैद्य यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कारांची शिदोरी दिली. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे ठरले. शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेल्या निष्ठावान आणि प्रदीर्घ सेवेबद्दल शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने त्यांचा गौरव केला.

या वेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. चौधरी सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. टिकले सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिनेश वैद्य यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या ज्येष्ठ शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचा प्रसंग उपस्थितांसाठी भावनिक ठरला. तीन दशकांच्या ज्ञानदानाच्या पर्वाला सन्मानपूर्वक निरोप देत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर