बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Crime News : स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे तरुण तरुणी खुप आशावादी असतात. त्याचं लक्ष परीक्षा पूर्ण करून सरकारी नोकरी मिळण्याकडे असते. यासाठी ते इतर शहरात जाऊन व्यास्तव्य करून तासनतास अभ्यास करतात.पण अशीच एक कल्याणची मुलगी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याचे सांगून घराबाहेर पडली. पण आता छत्तीसगडमध्ये तिचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.त्यामुळे नेमकं तरुणीसोबत काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
कल्याणमध्ये राहणाऱ्या या मुलीचे नाव अंजली घोडेस्वर असून ती 26 वर्षांची होती. मागच्या महिन्यात 8 सप्टेंबर 2026 ला ती तिच्या कुटुंबियांना पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी दिल्ली जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. पण आता तिचा मृतदेह छत्तीसगड जिल्ह्यातील दुर्गमध्ये सापडला आहे.त्यामुळे दिल्ली जाणारी अंजली छत्तीसगडमध्ये कशी पोहोचली? हे जाणून घेऊयात.
दिल्लीच्या दिशेने निघालेली अंजली छत्तीसगडच्या दू्र्गमध्ये पोहोचली. तिथे ती 23 वर्षीय CISF आरक्षक करण सिंह यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. दुर्गच्या शंकर नंगर गल्ली नंबर 10 येथील एका भाड्याच्या घरात ते दोघेही 15 दिवसांपूर्वी राहायला आले होते. करण सिंह हा पंजाबचा रहिवासी होता आणि भिलाई CISF आरक्षक पदावर तैनात होता.
अंजली आणि करण सिंह यांची मैत्री इंस्टाग्रामवर झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघांनीही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहायला सुरुवात केली. अंजलीच्या कुटुंबियांना या गोष्टीची काहीएक कल्पना नव्हती. पण कुटुंबीय करणला अंजलीचा मित्र म्हणून ओळखत होते,असे अंजलीची मावशी सांगते. पण दोघेही दुर्गमध्ये एकत्र राहत होते याची कुटुंबियांना कल्पना नव्हती.
अंजली घरी दिल्लीला पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. कुटुंबियांना या गोष्टीवर विश्वास बसावा यासाठी ती कोचिंग क्लासेसचे फोटो पाठवायचे. या फोटोंमध्ये क्लासरुम आणि विद्यार्थी आणि फळ्यावर लिहलेली शैक्षणिक माहिती होती. त्यामुळे मुलगी दिल्लीत चांगली तयारी करत आहे, असा कुटुंबियांना विश्वास होता.
पण जेव्हा अंजलीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा कुटुंबियांना कळाले की,अंजली दिल्लीत नव्हे तर छत्तीसगडच्या दुर्गमध्ये होती. विशेष म्हणजे कुटुंबाला अंजलीच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी नव्हे, तर करणने दिली. विशेष म्हणजे ही माहिती देताना त्याने त्याचा उल्लेख बॉयफ्रेंड म्हणून केला होता. तसेच आम्ही दोघे लग्न करणार होतो आणि आता हे असं घडून बसलं असे त्यांना सांगितले.त्यानंतर अंजलीच कुटुंबीय छत्तीसगडमध्ये पोहोचलं तिथे तिचा मृतदेह शवगृहात ठेवला होता.त्यानंतर पोलिसांना शवविच्छेदन केले आणि मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर कुटुंबीय कल्याणसाठी रवाना झाले होते.
करणने अंजलीने स्वत:हून आयुष्य संपवल्याची माहिती दिली.पण अंजलीच्या कुटुंबियांनी आता तिच्या मृत्यूवर शंका उपस्थित केला आहे.त्यांच्या मते पोलिसांनी दिलेल्या फोटोमध्ये अंजलीच्या शरीराची स्थिती खुप वाईट आहे, तिची एक कानातली देखील गायब आहे, तसेच कुटुंबियांना करण चेहऱ्यावर सुज देखील पाहिली आहे. पण या गोष्टींची पु्ष्ठी झालेली नाही.
अंजली स्वत:हून आयुष्य संपवल्याचे सांगितले जात आहे. पण अंजलीच्या लहान बहिण रेशम सौरभ फुल्लुकेने करणने तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे आम्हाला न्याय हवा, आणि तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार.तसेच तिने पोलिसांवर एफआयआर दाखल करुन घेतल्याचा देखील आरोप केला आहे.पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्ये सारखी वाटते आहे. पण घटनास्थळी मिळालेले पुरावे, फॉरेंन्सिक रिपोर्ट, मोबाईल आणि इतर गोष्टीचा तपास सुरु आहे. त्यामुळे अंजलीचा मृत्यू कसा झाला? आणि कुटुंबियांनी करणवर लागलेले आरोप? या सगळ्या बाजूने पोलिसांनी तपास सूरू केला आहे.