ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड : दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून त्याचा फटका आता शेतीसोबतच पशुपालन व्यवसायालाही बसू लागला आहे. पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जनावरांचा सांभाळ करणे दिवसेंदिवस कठीण होत असताना दुसरीकडे बाजारात पाळीव प्राण्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने पशुपालकांची आर्थिक कोंडी होत आहे. विशेषतः म्हैस आणि बैलांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील पशुपालक बाळासाहेब येवले यांनी सांगितले की, मागील वर्षी त्यांनी एक म्हैस एक लाख रुपयांना खरेदी केली होती. मात्र यंदा तीच म्हैस विक्रीसाठी बाजारात आणली असता केवळ 50 हजार रुपये मिळाले. म्हणजेच वर्षभरात म्हशीच्या किमतीत तब्बल 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. जनावरांच्या संगोपनासाठी चारा, पाणी आणि इतर खर्च करावा लागत असताना विक्रीच्या वेळी अपेक्षित दर मिळत नसल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

म्हशींसोबतच बैलांच्या किमतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी खिल्लारी बैलांची जोडी 85 हजार ते एक लाख रुपयांच्या आसपास विकली जात होती. मात्र यंदा त्याच बैलजोडीला 55 ते 65 हजार रुपये दर मिळणेही कठीण झाले आहे. दुष्काळामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम झाला असून बैलांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे जनावरे विक्रीसाठी आणल्यानंतरही खरेदीदार मिळत नसल्याने पशुपालकांना कमी दरात विक्री करण्याची वेळ येत आहे.

दरम्यान, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतातील पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके नष्ट झाली असून लागवडीसाठी केलेला खर्चही परत मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात आहे. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने पशुपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यातच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडत आहे.

एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे जनावरांच्या किमतीत झालेली घसरण आणि त्यातच वाढलेला संगोपनाचा खर्च यामुळे शेतकरी आणि पशुपालक तिहेरी संकटात सापडले आहेत. जनावरे विकावीत तर योग्य दर मिळत नाही आणि विक्री न करता सांभाळावीत तर चारा-पाण्याचा खर्च परवडत नाही, अशी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या या परिस्थितीत पशुपालकांना दिलासा देण्यासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच जनावरांच्या बाजारातील घसरणाऱ्या किमतीकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

 

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर