ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवारांचा मृत्यू अपघाती वाटत नाही:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला संशय; ब्लॅकबॉक्स बंद असल्याच्या मुद्यावर आक्षेप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाच्या मुद्यावर संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी ब्लॅकबॉक्स खराब झाला किंवा त्यातून काहीही माहिती प्राप्त होत नाही असे म्हटले जाते तेव्हा निश्चितच दाल में कुछ काला हैं असा संशय येतो, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून या अपघाताविषयी संशय व्यक्त केला जात आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भर पडली आहे. विजय वडेट्टीवारांनी मंगळवारी या प्रकरणी बोलताना अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असा दावा केला. ते म्हणाले, अजित पवारांचा मृत्यू अपघाती आहे की घातपात आहे याविषयी देशभरात खूप चर्चा सुरू आहे. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही. याविषयी ज्या काही शंका उपस्थित झाल्यात त्यात काही प्रमाणात तथ्य वाटते. ब्लॅक्सबॉक्स खराब झाला आहे किंवा त्यातून काही माहिती प्राप्त होत नाही असे समोर येते तेव्हा त्याचा अर्थ दाल में कुछ काला हैं असा लावला जातो, असे ते म्हणाले. रुपाली ठोंबरे पाटील यांचाही संताप दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. ब्लॅकबॉक्समधील माहिती समोर येत नाही म्हणून तुम्ही तो परदेशात पाठवणार. परत 15-20 दिवस घेणार. नवीन कुठला तरी हा पुरावा सापडत नाही किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या खरेच खूप संशयाच्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवारांचाही अपघातावर संशय उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाच्या संथगतीने होणाऱ्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या अपघाताला 20 दिवस झाले, पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. आज ब्लॅकबॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे, त्यावरून मी 5 दिवसांपासून वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. पण आम्ही दादांचा अपघात की घातपात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर