ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

महिला आरक्षणावरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे:अडीच वर्षांपूर्वी बिल पास होऊनही अंमलबजावणी का नाही? अनिल देशमुखांचा भाजपला सवाल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. बारामतीमध्ये सांगता सभा आहे तिथे आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत, ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. भाजप जनतेची दिशाभूल करतंय अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अडीच वर्षांपूर्वी 2023 मध्येच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे हे बिल पास झाले. पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही, यावर भाजप काहीही बोलत नाही. 543 सदस्यांच्या संसदेत हे आरक्षण द्यायला हवे होते. पण त्यांवर काही कारवाई झाली नाही. भाजपकडून केवळ जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे. काही जणांचे तर म्हणणे आहे की 33 नाहीतर 50 टक्के आरक्षण करा. 2023 मध्ये सर्वांनी मतदान केले अनिल देशमुख म्हणाले की, 2023 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आम्ही सर्वांनी या बिल पास व्हावे यासाठी मतदान केले पण भाजप या बिलाच्या नावाने राजकारण करत आहे. महिलांना आरक्षण मिळावे यासाठी सर्वांचा पाठिंबा आहे. शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण कधीच दिले आहे. भाजपकडून केवळ या गोष्टीचे राजकारण सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी पास झालेल्या विधेयकाची अजून नोटीफिकेशन काढण्यात आले नाही, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. विरोधकांनी कधीही महिला आरक्षण विधेयक पाडले नाही विरोधकांकडून महिला आरक्षणासंदर्भातील कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरुन घालवायचे आहे, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहे का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर देशाची सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी 850 सदस्य करण्याचे डिलिमीटेशन बिल आणण्यात आले, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर