ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

ऑटो युनियनतर्फे चांदूरबाजार बसस्थानक परिसरात पाणपोई:आयपीएस अधिकारी सागर भामरे यांची यावेळी उपस्थिती‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | चांदूरबाजार वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बसस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने चांदूरबाजार ऑटो युनियनच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे रीतसर उद्घाटन आयपीएस अधिकारी सागर भामरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ऑटो युनियनचे अध्यक्ष मुमताजिर उर्फ मोंटू खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम दरवर्षी उन्हाळ्यात राबवला जातो. या पाणपोईच्या माध्यमातून बसस्थानक परिसरात येणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत थंडगार पाणी उपलब्ध करून दिले जाते. वाढत्या तापमानात प्रवाशांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवून त्यांना दिलासा देण्याचे काम या उपक्रमाद्वारे होत आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित नागरिकांनी आणि प्रवाशांनी ऑटो युनियनच्या या सामाजिक जाणिवेचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला प्रवासी मित्र मंडळाचे मदन भाटे, सुमित हरकूट व शरद केदार प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान सामाजिक बांधिलकी जपून नागरिकांच्या सेवेसाठी असे जनहिताचे उपक्रम ऑटो युनियनतर्फे यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील, अशी ग्वाही ऑटो युनियनचे अध्यक्ष मुमताजिर उर्फ मोंटू खान यांनी दिली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ऑटो युनियनचे अनिस अहमद, अश्विन टेकाडे, नसीम अली, शेख रहेमत नसुल्लाखान, सादिक शाह, शेख जावेद, विजय मानकर, वहिदा भाई, यश निंबोरकर, शुभम निंबोरकर यांसह युनियनच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले. ऑटो युनियनच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात स्वागत होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर