ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महापौर रितू तावडेंच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल:किशोरी पेडणेकर म्हणाल्या- प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागतेय; सुषमा अंधारेंचाही टोला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील निशाणा साधला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापौर रितू तावडे यांना प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागत आहे. असे नेहमीच का होत आहे? सध्या अशोक खरातमुळे वातावरण गरम असताना रितू तावडे मुनींसमोरच तुमच्यामुळे माझा घसा बरा झाला, असे म्हणाल्या. ॐ च्या उच्चारात प्राणायाम आहे. आपण एकदा प्राणायाम सुरू केला की ठीक व्हायला 2 वर्षे लागत नाहीत. आपल्या स्वरनलिकेवर दाब येऊन घर्षण होऊन आजार बरा होतो. मी त्या गुरुजींचा आदर करते पण आपण एकदा काही बोलतो त्याला सारवा सारव करावी लागू नये, असे म्हणत पेडणेकर यांनी तावडेंचे कान टोचले आहेत. सुषमा अंधारेंचा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट करत रितू तावडे यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले आहे. अंधारे म्हणाल्या, राजकारणातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अत्यंत जबाबदारीने वागलं बोलल पाहिजे कारण त्यांचा वर्तनव्यवहार हा सामान्य जनतेसाठी पथदर्शी असतो. रितूजी तुमच्या श्रद्धेचा आदरच मात्र समस्त मुंबईकरांच्या घशाची काळजी घेण्यासाठी मुंबईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा आणि शुद्ध हवेची जास्त गरज आहे. तुमची महापौरपदी निवड सुद्धा नेमकी याच कामासाठी झाली आहे हे तुम्हाला आठवत असेलच, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे. …तर अजून एक खरात जन्माला येईल- संदीप देशपांडे मनसे नेते संदीप देशपांडे यांना रितू तावडे यांच्या विधानावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, चांगले आहे. असे आशीर्वादाने गळे बरे होत असतील तर अजून एक खरात जन्माला येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने रितू तावडे महापौर- मंत्री लोढा दरम्यान, गुरुजींच्या आशीर्वादाने रितू तावडे महापौर झाल्याचे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. ते म्हणाले, गुरुदेवजींची भेट घेतल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादामुळे रितू तावडे मुंबईच्या महापौर होऊ शकल्या, असे वक्तव्य लोढा यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर