ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू:बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने बंद पडलेली लाईन सुरू करण्याचा प्रयत्न

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | चांदूर रेल्वे शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी ११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या २४ वर्षीय युवकाचा करंट लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सावंगी संगम परिसरात घडली. मृत युवकाचे नाव अंकुश श्रावणजी नेवारे असे आहे. अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करीत होता. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून शेतातील वीजपुरवठा बंद असल्याने लाईन सुरू करण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास अंकुश शेताजवळील ११ केव्ही विद्युत पोलवर चढून जंपर बदलण्याचे काम करीत होता. संबंधित लाईन दररोज सायंकाळी चार वाजता बंद होऊन सहा वाजता सुरू होते, असा त्याचा समज होता. मात्र अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला आणि तो मृत झाला. काही काळ प्रतीक्षा केली असती तर घात टळला असता गावकऱ्यांच्या माहितीनुसार, अंकुशच्या शेतात मंदिर बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने बंद पडलेली लाईन सुरू करण्याचा तो प्रयत्न करीत होता. मात्र नियतीने घात केला आणि या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंकुशच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार असून, या घटनेमुळे सावंगी संगम गावावर शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर