ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

संभाजीनगरात 10 स्वीकृत नगरसेवकपदांसाठी 50 बंडखोरांना दिलेला शब्द येणार अंगलट:5 जागांवर भाजप, 3 जागा एमआयएमला तर शिंदेसेनेला 1 स्वीकृत नगरसेवक निवडता येणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनेक इच्छुकांना निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमची वर्णी लावू, असा शब्द दिला होता. यामध्ये प्रामुख्याने भाजपने 15 ते 20, शिवसेनेकडून 12 ते 15, एमआयएमकडून 8 ते 10, उबाठाकडून 8 ते 10 तर काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित यांनीदेखील आपल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदी घेण्याचा शब्द दिलेला आहे. स्वीकृत सदस्यांची संख्या 5 वरून 10 झाली असली तरी इच्छुकांची गर्दी पाहता नेत्यांचा मोठा कस लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा 10 सदस्य (यापैकी जी संख्या कमी असेल) इतके स्वीकृत नगरसेवक निवडले जाऊ शकतात, असे राजपत्र 23 मार्च 2023 रोजी काढलेले आहे. यामुळे काहीशा प्रमाणात नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार 5 जागांवर भाजप, 3 जागा एमआयएमला तर शिंदेसेनेला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. उद्धवसेना, वंचित यांच्याकडे त्या तुलनेत संख्याबळ नाही. स्वीकृत नगरसेवक पदावर संधी मिळावी यासाठी पराभूत उमेदवारांकडूनही फील्डिंग लावली जात आहे. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो ज्या अनुभवी कार्यकर्त्यांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना काही कारणास्तव प्रत्यक्ष निवडणुकीत उतरता आले नाही, त्यांच्यासाठी हे पद राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रमुख साधन आहे. स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी महापालिका प्रशासनाचा अनुभव, सामाजिक कार्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारख्या क्षेत्रातील विशेष पदवी असणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रत्येक राजकीय पक्षाला स्वीकृत नगरसेवक पदे दिली जातात. स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या सभांमध्ये चर्चेत सहभागी होता येते. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो आणि ते महापौर पदासाठी उभे राहू शकत नाहीत. शब्द पूर्ण करताना पत्करावा लागणार रोष या निवडणुकीत भाजपकडे 1400 पेक्षा अधिक उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. शिवसेनेकडे देखील 900 पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले. एमआयएमकडे 700 पेक्षा अधिक, उद्धवसेनेकडे 600 पेक्षा अधिक उमेदवारांनी तिकिटाची मागणी केली होती. यातील उमेदवारी न मिळालेल्या शेकडो लोकांनी बंडखोरी केली. भाजपच्या विरोधात तर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलन झाले. या सर्वांना पक्षांतील नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ, असा शब्द दिला आहे. यामुळे आता हा शब्द पूर्ण करताना नेत्यांना पुन्हा एकदा रोष पत्करावा लागणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर