ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

श्रीक्षेत्र देवगडात विठ्ठलनामाचा गजर;‎ “कृष्ण जन्मोत्सव” सोहळा उत्साहात‎:ज्ञानसागर मंडपात हजारो भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रम‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | नेवासे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘विठ्ठल माझा माझा’ या अजरामर भक्तिगीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध असलेले राधाकृष्ण महाराज यांच्या अमोघ वाणीतून वाहणाऱ्या भागवत कथेमुळे सध्या देवगड परिसरात भक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे. देवगड देवस्थानच्या भव्य ज्ञानसागर मंडपात झालेल्या या कृष्ण जन्म सोहळ्यासाठी जिल्हाभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. फुलांची उधळण, गोपालकृष्णाचा जयघोष, आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण देवगड नगरी हरिनामाने दुमदुमून गेली. राधाकृष्ण महाराज यांची देवगड येथील ही दुसरी भागवत कथा असून, महाराजांच्या रसाळ, ओजस्वी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या निरूपणामुळे श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत. कथेसोबतच ज्ञानसागर मंडपात विष्णू यागाचे भव्य पौरोहित्य गणेश गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार पडत आहे. सोहळ्यानिमित्त पहाटे काकडा आरती, श्रीमद्भगवद्गीता पाठ, हरिपाठ, भजन आणि हरीकीर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण देवगड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. गुरुवारी काल्याचे कीर्तन: या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक बजरंग विधाते हे करत आहेत. दरम्यान, येत्या गुरुवारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य सोहळ्याचा समारोप होणार असल्याची अधिकृत माहिती देवस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी दिली. २५ हजार भाविकांची दररोज भोजन व्यवस्था श्रीमद् भागवत कथेनिमित्त देवगडात ज्ञान आणि भक्तीच्या यज्ञाबरोबरच अन्नदानाचा महायज्ञही अविरतपणे सुरू आहे. देवस्थानच्या भव्य ‘अन्नपूर्णा प्रसादालया’मध्ये दररोज सकाळ आणि सायंकाळ मिळून सुमारे २५ हजार भाविकांच्या महाप्रसादाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.देवगड सेवाधारी मंडळ, स्वयंसेवक आणि विविध समित्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही भोजन व्यवस्था सांभाळली जात असून, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आदराने महाप्रसाद दिला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर