ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा घेराव:जीएमसीतील व्हिडिओ व्हायरल प्रकरण; प्रशासनाकडून रुग्णसेवा सुधारण्याचे देण्यात आले आंदोलकांना आश्वासन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाईसाठी संतप्त झालेल्या युवक काँग्रेसने बुधवारी तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक आकाश कवडे यांनी केले. सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गत आठवड्यात घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आणि संभाजी ब्रिगेडने सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर बुधवारी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत महाविद्यालयात धाव घेतली. युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा वाढता रोष लक्षात घेत प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले. आंदोलनानंतर आ. पठाण यांच्या उपस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ. सोनू यांनी व्हायरल व्हिडिओतील प्रकाराबाबत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच रुग्णालयात घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याची कबुली देत प्रशासनाच्या वतीने रुग्णसेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले. आंदोलनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सारवान, पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश तायडे पाटील, अकोला पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शारिक, माजी नगरसेवक पराग कांबळ, मो. इरफान, नगरसेविका सुवर्णा रेखा जाधव, महिला काँग्रेस अध्यक्ष कशिश खान, विजय जामाणिक, विधी सेलचे अध्यक्ष अंकुश गावंडे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित तवर, ऋषिकेश जामोदे, शुभम हिरळकर, योगेश गावंडे, अजय खंडारे, साहिल तेलगोटे आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर