ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कोठारे गावामध्ये पोहोचवले 10,000 लिटर पाणी:शहापुरात ‘जलदान मोहिमे’मुळे तीनशे कुटुंबांची पाण्यासाठीची पायपीट थांबली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जेव्हा कडक उन्हात घसा कोरडा पडतो आणि पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तेव्हा पाण्याचा एक हंडाही अमृतासारखा वाटतो. असाच काहीसा ‘अमृताचा अनुभव’ शहापूर तालुक्यातील कोठारे येथील ३०० आदिवासी कुटुंबांनी घेतला. विविध सामाजिक संस्था आणि संवेदनशील सुजाण नागरिकांनी एकत्र येत राबवलेली “आयडेंटिटी वॉटर फॉर लाइफ – जलदान मोहीम २०२६” ही केवळ पाणी वाटपाची मोहीम ठरली नाही, तर ती माणुसकी आणि आशेचा नवा किरण घेऊन आली. माउलींच्या चेहऱ्यावर हसू, चिंता मिटली : ज्या गावात महिलांना पाण्यासाठी दररोज ५ ते ६ किलोमीटरची खडतर पायपीट करावी लागते, तिथे जेव्हा पाण्याचे टँकर पोहोचले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. किमान आठवडाभरासाठी पाण्याची चिंता मिटल्यामुळे आदिवासी भगिनींच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. तब्बल १०,००० लिटर शुद्ध पाण्याचे वाटप करून ३०० हून अधिक कुटुंबांची तहान भागवली. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असतो, याची प्रचिती या वेळी संपूर्ण गावाने अनुभवली. रोज सकाळी उठल्यावर पाणी कुठून आणायचं, हाच विचार डोक्यात असायचा. पोराबाळांना सोडून मैलोन्‌मैल चालावं लागायचं. आज पाणी दारात आलेलं पाहून ऊर भरून आलाय, अशी भावनिक प्रतिक्रिया आदिवासी महिलांनी व्यक्त केली. केवळ पाणी पुरवणे एवढाच या मोहिमेचा उद्देश नसून, दुर्गम भागात आशेचा किरण निर्माण करणे, आरोग्य सुधारणे आणि शाश्वत बदल घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. आयोजकांकडून कायमस्वरूपी तोडगा नेहमीप्रमाणे फक्त पाणी देऊन निघून जाण्यापेक्षा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. या दुर्गम आदिवासी भागात भविष्यात एक लहान धरण उभारण्याचे अधिकृत आश्वासन संस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून, गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिरकणी क्लबचे सदस्य उपस्थित ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जी.जी.यू.एस. फाउंडेशनचे गगन शिंदे, हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी, स्मधूना फाउंडेशनचे प्रतीक आंबेकर तसेच मनीषा सुर्वे (सचिव, हिरकणी महिला सायकल क्लब) यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी हिरकणी क्लबच्या सदस्या प्रणिता भोसले, समृद्धी राणे आणि जयवंत सुर्वे हेदेखील उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर