ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

रावेर, यावल तालुक्यांत वादळासह पाऊस:जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किरकोळ वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसानंतर वातावरणात बदल झाला.
दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीअंंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी पाऊस झालेला नाही. मात्र बहुतांश भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण हाेते. अरबी समुद्रातील आर्द्रता आणि बदलत्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात आकाश ढगाळ बनले आहे. ढगांमुळे उन्हाची थेट तीव्रता कमी झाली असली, तरी हवेतील दमटपणा वाढला आहे. यावल तालुक्यातील फैजपूर, आमाेदा, दहिगावात तसेच रावेर शहरासह तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारच्या सुमारास पंधरा मिनिटे पाऊस झाला. केळी पिकावर वाढत्या उष्णतेचा परिणाम होत असताना या बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर