ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न:भंडाऱ्यात थरारक घटना; राजकीय वैर की वैयक्तिक सूड? पेट्रोल बॉम्बने हल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा जिल्ह्यातील शहापूर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्ब हल्ला करून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने, कुटुंबीय जागे असल्याने आणि त्यांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या हल्ल्यात घरासमोरील वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या शांततेत अचानकपणे घराच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. बॉम्ब फुटताच आगीने रौद्र रूप धारण केले. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि घरासमोरील एक कार यांना आग लागली. काही मिनिटांतच या सर्व वाहनांनी पेट घेतला आणि पाहता पाहता ती पूर्णपणे जळून खाक झाली. घरालाही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र प्रसंग वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे लक्षात येताच गाडेकर कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजामुळे शेजारील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले. नागरिक जमा होत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी तातडीने पळ काढल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी पाणी आणि इतर साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेमागे वैयक्तिक वाद, जुन्या भांडणातून सूड की राजकीय कारण, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. या घटनेने भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर