ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

एमआयडीसीत भूखंडधारकांना वर्षभरात 40% बांधकाम बंधनकारक:अट न पाळल्यास भूखंड परत घेण्याचा प्रशासनाचा निर्णय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एमआयडीसीमध्ये भूखंड घेणाऱ्या उद्योजकांना आता एका वर्षाच्या आत किमान ४० टक्के बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास त्यांना भूखंड परत करण्याची तयारी ठेवावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे प्रधान सचिव (उद्योग) आणि राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नांदगाव पेठ येथे नवीन उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी जून २०२६ मध्ये उद्योग परिषद (समिट) आयोजित करण्याचेही ठरविण्यात आले. महाराष्ट्रातील ‘ड’ आणि ‘ड प्लस’ प्रवर्गातील सूक्ष्म उद्योगांवरील अटी रद्द करण्याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नवीन भूखंडासाठी एका वर्षात ४० टक्के बांधकाम सक्ती, अग्निशमन व्यवस्था, पाणीपुरवठा, जीएसटी आणि नांदगाव पेठ येथील प्रस्तावित टेक्सटाईल पार्कसाठी नवीन उद्योजकांना आकर्षित करण्याच्या सुविधांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह आमदार प्रतापदादा अडसड, अमरावती एमआयडीसी येथील लघू उद्योग भारतीचे अध्यक्ष आशिष सावजी, उद्योजक श्रीमती प्रीती सावजी, वीरेंद्र लढ्ढा, अविनाश लिंगे, आफाक सुभेदार, अवर सचिव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता शिंदे आणि दत्ता गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावती येथील जुन्या व नव्या एमआयडीसीमध्ये अनेक भूखंड उद्योगाविना पडून आहेत. काही जण हे भूखंड केवळ गुंतवणुकीसाठी किंवा भाडेतत्त्वावर देण्यासाठी घेतात, स्वतः उद्योग उभारण्याचे टाळतात. यामुळेच शासनाने हे कठोर धोरण अवलंबले असून, वर्षभरात कारखान्याची इमारत ४० टक्के पूर्ण करण्याची अट घातली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर