ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यात सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप सर्वाधिक 12 जागांवर निवडणूक लढवेल. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 3 व 2 जागांवर समाधान मानावे लागेल. पण महायुतीत 1-2 जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने विधान परिषदेच्या 6 जागांची मागणी केली आहे. पण भाजपने त्यांना केवळ 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पक्षाचे गाऱ्हाणे मांडणार आहेत. विधान परिषदेच्या जागावाटपाच्या मुद्यावर राज्यात तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यास प्राधान्य दिले आहे. अमित शहांसोबतच्या बैठकीत शिंदे पक्ष विस्ताराच्या मुद्यावर अर्थात ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा करण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या जागेवर अडले घोडे सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिवसेनेमध्ये बहुतांश जागांवर मतैक्य झाले आहे. पण ठाण्याच्या जागेवर घोडे अडले आहे. भाजप या जागेसाठी आग्रही आहे. तर शिवसेनेने ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यावरील दावा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पेच फसला आहे. शिंदे गटाने या प्रकरणी जागांची अदलाबदली करण्याचा आग्रह धरला आहे. ठाण्याच्या जागेवर भाजपचा युक्तिवाद काय? भाजपने ठाणे विधान परिषदेच्या जागेवर जोरदार दावा केला आहे. या ठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह भाजप आमदार संजय केळकर यांनी धरला आहे. ठाण्यात सध्या भाजपचे 444 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत शिवसेना व जिजाऊ संस्थेकडे केवळ 346 सदस्य आहेत. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत आहे. भाजप या ठिकाणी ठाण्याचाच उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. संजय केळकर यांच्या या भूमिकेला साजेशी भूमिका भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतल्यामुळे या जागेवरून महायुतीत फटाके फुटण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांनी दिली दौऱ्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी शिंदेंच्या या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ नेते बोलणी करत आहेत. 17 पैकी किती जागा मागितल्या, किती मागायच्या यावर अजून कुणाकडेही स्पष्टता नाही. आम्ही 7 जागा मागितल्या. राष्ट्रवादीने किती मागितल्या. भाजपाने किती मागितल्या या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेचा शेवट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांची बैठक झाल्यानंतर होईल. सध्या एकनाथ शिंदे चर्चेसाठी दिल्लीत गेलेत अशा काही बातम्या चालतात त्यात काही तथ्य नाही. शिंदे साहेब विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलेत. ते गेल्या आठवड्यातही दिल्लीला गेले होते. आताही गेले आहेत. विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणे हे मनाला पटणारे नाही, असे ते म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते? भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले होते, सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला गेल्यामुळे जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर