ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे : ज्येष्ठ महिला घरात एकटीच; ‘ती’ आली, मालिश करण्याच्या बहाण्यानं घरात प्रवेश अन् काहीच मिनिटात घडलं का… ✦ ⚡ मिठाई खायला दिली, डोळ्यावर पट्टी बांधली; सहावीत शिकणाऱ्या पुतणीसोबत… चुलत्याच्या कृत्यानं कोल्हापुरात संत… ✦ ⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तो वाघाकडे अन् वाघ त्याच्याकडे पाहतोय, दुचाकीस्वार आणि वाघ समोरासमोर, श्वास रोखून धरायला लावणारा Video ✦ ⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव…
SP News Maregaon

24 वर्षीय युवकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू:शेतातील वीज दुरुस्त करताना घडली घटना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चांदूर रेल्वे येथील सावंगी संगम परिसरात शेतातील वीजपुरवठा दुरुस्त करत असताना वीजेचा धक्का लागून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकुश श्रावणजी नेवारे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करत असे. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून, शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने तो वीजपुरवठा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास अंकुश शेताजवळील ११ केव्ही विद्युत पोलवर चढून जंपर बदलण्याचे काम करत होता. संबंधित लाईन दररोज सायंकाळी चार वाजता बंद होऊन सहा वाजता सुरू होते, असा त्याचा समज होता. मात्र, अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. यात तो खांबावरच लटकलेल्या अवस्थेत मृत झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले आणि त्यांनी अंकुशला खांबावरून खाली उतरवले. याबाबत चांदूर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे आणण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अंकुशच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर