ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट:पाकमध्ये बसलेल्या बॉसला खूश करण्यासाठी मोदींविरोधात बोलतात, मंत्री नीतेश राणे यांचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या महागाई, इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी आदी विविध मुद्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी मोदींना चक्क महागाई मानवाची उपमा दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी त्यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले, राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकची भाषा आपल्या तोंडातून बोलतात. पाकला खुश करण्याची सर्व तयारी राहुल गांधी यांची आहे. ते तेथून येणारी स्क्रिप्ट येथे वाचून दाखवतात. पाकिस्तानातील आपल्या मालकाला खूश करण्यासाठी त्यांचा हस्तक राहुल गांधी येथे येतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतो. बकरीदला गोवंशाकडे पाहिले तर मुक्काम तुरुंगात नीतेश राणे यांनी यावेळी राज्यात अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची खुली विक्री केली जात असल्याचाही आरोप केला. ते या प्रकरणी एमआयएचे नेते वारीस पठाण यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची विक्री केली जात आहे. जनावरांची तस्करी सुरू आहे. तुम्हाला तुमच्याच धर्मातील जिहादींना आवर घालता येत नसेल, त्यांनी आमच्या हिंदू राष्ट्रात कसे वागावे हे शिकवता येत नसेल, तर आम्हाला जीआर काढून दंड ठोठावावा लागेल. त्यामुळे बकरीदच्या नावाखाली कुणी आमच्या गो मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांचा मुक्काम थेट तुरुंगात असेल. नीतेश राणे यांनी यावेळी रस्त्यांवर अदा करण्यात नमाजासह कथितपणे शरिया कायदा लागू करण्यावर तुरुंगावासाचाही इशारा दिला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, गोमांसाशी संबंधित गुन्ह्यांत सहभाग असलेल्या व्यक्तींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यातील कठोर तरतुदी थेट लागू केल्या जातील. पोलिसांनी या प्रकरणी विविध ठिकाणी संचलन सुरू केले आहे. नियमांचे उल्लंघन करण्याचा किंवा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यासंबंधी तुरुंगाची हवा खावी लागेल. मदरसे बनले दहशतवादाचे अड्डे रस्त्यावर नमाद अदा करण्याच्या प्रथेचा संदर्भ देत ते म्हणाले, नमाज रस्त्यावर अदा करायची असेल, तर आपण मशिदीच बंद करून टाकूया. आपल्या हिंदू राष्ट्रातील रस्ते लोकांच्या चालण्यासाठी आहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी आहेत. पण सध्या रस्त्यांवर नमाज अदा केली जात आहे. मदरसेही सध्या दहशतवादाची केंद्र बनले आहेत, असे नीतेश राणे म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर